स्पिती भ्रमंती: पहिले पाऊल

First-Step-200x300उंबरा ओलांडणे, ह्या गोष्टीचे आपल्याकडे काही विशेष महत्व आहे, वास्तविक पाहता हा उंबरा ओलांडून किंवा ओलांडूनच आपण रोज घरात येत जात असतो . पण हाच उंबरा जेव्हा नवी नवरी ओलांडून घरात येते तेव्हा ती घ्रहाल्क्ष्मी होते आणि हाच उंबरा जेव्हा एखादे लहान मुल उलान्डते तेव्हा बाळ मोठे होते .
आम्ही स्पिती मधील (किंबहुना जगातील) सगळ्यात उंचावर कायमस्वरूपी वसलेल्या कौमिक गावात (हिवाळ्यामध्ये बर्याच गावातील लोक खालच्या भागात येत असत) गेलेलो (उंची ४५८७ मी). तिथे अवघे ११४ लोक किवा त्यांच्या म्हणण्या नुसार प्राणी राहतात (माणसांना प्राणी, आत्मे असे संबोधणार्या अनेक पाट्या तिकडे दिसतात) हेच जगातील सगळ्यात उंचावरचे मतदानकेंद्र पण आहे . आमचे मुख्य आकर्षण होते कि जगातील सगळ्यात उंचावर कार्यरत असलेल्या पोस्ट ऑफिस (हिक्कीम) मधून घरी आणि मित्रांना पत्र पाठवणे.
कौमिक च्या मंदिरात (Monastery) भेटलेला हा आमचा छोटा मित्र, असाच कुतूहलाने उंबरा ओलाडत होता उत्तुंग हिमालयाच्या खाद्यावर बागडायला, त्याच्याशी खेळायला…

For more information on Komik and Kaza check wiki page

2 thoughts on “स्पिती भ्रमंती: पहिले पाऊल

  1. Im not that much of a online reader to be honest but your blogs really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your site to come back later. Cheers kcgekkeegegd

    1. Thanks a lot for appreciation it keeps us motivated to keep working & writing more n more.:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *